



आमचं ध्येय
0-३ वर्षांच्या बालकाच्या संगोपनासाठी कुटुंब आणि समुदायाला सक्षम करणे.
#EarlyMomentsMatter
थोडक्यात
भारतातील तरुण पिढी त्यांच्या अपुऱ्या क्षमतेमुळे शैक्षणिक क्षेत्रात अपयशी ठरत आहे. त्याचबरोबर अपुऱ्या पोषणामुळे रोजगार क्षमता, ताणतणाव आणि मर्यादीत शिक्षण मिळत असल्यामुळे डब्ल्यूएचओ / युनिसेफने यावर लक्ष केंद्रित करून (nurturing care framework) कृतीसाठी एक आराखडा तयार केलेला आहे. त्यानुसारच गर्भधारणेपासून ते ३ वर्षापर्यंतच्या कालावधीवर विशेष लक्ष केंद्रित करून बालकांच्या विकासासाठी सेवा देणारे, तसेच कुटुंबाचे आणि समुदायाचे सक्षमीकरण करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर अधिक भर देत आहे. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था सेवाग्राम २०१० पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS), आरोग्य विभाग तसेच इतर विभागासोबत प्रायोगिक आणि विस्तारित तत्वावर बालसंगोपनासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.
‘आरंभ’
कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ५ वर्षाखालील ४३% बालकांना बुटकेपणा आणि योग्य विकासाची पातळी गाठू न शकण्याचा धोका आहे…
बालविकास
बालकांच्या जीवनातील सुरवातीचा काळ त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. अनेक संशोधनात असे…
प्रशिक्षण
येत्या ३ वर्षात राज्यभरातील सर्व जिल्हयात ‘आरंभ’ प्रकल्पाअंतर्गत बालसंगोपनाचे काम सुरु करायचे आहे. या अंमलबजावणीचे नेतृत्व महिला व बालकल्याण विभाग…
आरंभचा विस्तार
प्रतिक्रिया
 
											 
											 
											 
											 
											 
				 
								 
								