प्रशिक्षण

 २०१८ ते २०२० या कालावधीमध्ये यवतमाळ व औरंगाबाद या दोन जिल्हातील एकात्मिक बाल विकास योजना यांच्या अंतर्गत पर्यवेक्षिका तर आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत समूह संघटक, आशा गटप्रवर्तक यांचे एकत्रित पाच दिवसाचे प्रशिक्षण घेतले जात होते. हे पाच दिवसाचे प्रशिक्षण पुढील तीन महिन्यामध्ये अंगणवाडी व आशा कार्यकर्ती यांना एकत्रितपणे महिन्यातून एक दिवस त्या बीट / पी. एच. सी. अंतर्गत येणाऱ्या पर्यवेक्षिका व गटप्रवर्तक यांच्या मार्फत दिल्या गेले. अशाप्रकारे प्रशिक्षणाचा पहिला टप्पा तीन महिन्यात पूर्ण झाल्यानंतर दूसरा टप्पात पुन्हा पर्यावेक्षिका व समूह संघटक, आशा गटप्रवर्तक यांना पाच दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जात होते. त्यांच्या मार्फत अंगणवाडी व आशा कार्यकर्तींना एकत्रित प्रशिक्षण दिल्या जात. अशाप्रकारे अंगणवाडी पर्यवेक्षिका, समूह संघटक, आशा गटप्रवर्तक यांचे एकत्रित पाच टप्प्यामध्ये म्हणजे २५ दिवस प्रशिक्षण दिल्या गेले तर प्रत्येक महिन्याला एक दिवस असे १५ महीने अंगणवाडी व आशा कार्यकर्ती यांना एकत्रित आरंभचे प्रशिक्षण दिल्या गेले. अशाप्रकारे वरच्या स्तरापासून ते उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थीपर्यंत माहिती पोहचण्यासाठी कॅस्केड मॉड्यूलचा उपयोग करण्यात आला व तो खूप प्रभावी ठरला.

“आरंभ” उपक्रमाचा विस्तार संपूर्ण औरंगाबाद व यवतमाळ जिल्ह्यामध्ये करताना तीन टप्प्यामध्ये प्रशिक्षण घेण्याचे ठरविले. त्यात पहिला टप्पा पाच दिवसाचा तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात तीन तीन दिवसाचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले. प्रायोगिक प्रकल्पातील दोन जिल्हातून काही पर्यवेक्षिकांची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. त्या अंतर्गत यवतमाळ व औरंगाबाद जिल्हयातील १० तालुके सोडून इतर तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिकांना निवड केलेल्या मुख्य प्रशिक्षक व आरंभ टीमने एकत्रितपणे प्रशिक्षण दिले.

आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास योजनेतर्फे आरंभ उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत महसूलनिहाय प्रत्येक विभागातील सर्व जिल्ह्यांमधून निवडक प्रशिक्षकांना विभागस्तरावर पहिल्या टप्प्यात पाच दिवसांचे प्रशिक्षण व दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात तीन तीन दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येईल. विभागस्तरावरील प्रशिक्षण मुख्य प्रशिक्षक व आरंभ टीम मिळून देतील. पुढे या निवडक प्रशिक्षकांनी आपापल्या जिल्हयातील सर्व प्रशिक्षकांना प्रशिक्षित करणे अपेक्षित आहे.

प्रशिक्षणाची ठळक वैशिठ्ये:

  • आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रशिक्षकांचे एकत्रित प्रशिक्षण
  • गृहभेट, पालकसभा व पालकमेळाव्यांची प्रत्यक्ष क्षेत्रभेट
  • मनोरंजनात्मक खेळ व बालगीतांद्वारे वातावरण निर्मिती
  • प्रशंसनात्मक चौकशी पद्धतीचा वापर
  • प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थीमध्ये दुतर्फी संवाद
  • वेगवेगळे भूमिका नाट्य व कृतींच्या माध्यमातून विषयाचे सादरीकरण
  • प्रशिक्षणार्थींना सक्रियपणे सहभागी करून घेणे
  • प्रशिक्षणार्थींची प्रभावी प्रशिक्षक म्हणून क्षमता बांधणी
  • स्थानिक गरजांनुसार प्रशिक्षणाच्या नियोजनात लवचिकता
प्रशिक्षणातील विषय
पहिला टप्पा
वाढ व विकास

बालविकास का ?

गृहभेट

पालकसभा

प्रतिसादात्मक आहार
दुसरा टप्पा
प्रशंसा आणि चौकशी

संसाधन कृती आराखडा, पालक मेळावा

आहार प्रात्यक्षिक

वजन दिवस
तिसरा टप्पा
विशेष गरज असणाऱ्या बालकांची काळजी

प्रतिक्रिया