स्वच्छता व आरोग्य

पार्श्वभूमी

बालकाच्या विकासामध्ये खेळ हा महत्वाचा घटक आहे. बालक घरातील भांडी तसेच खेळणी सोबत खेळत असताना ती खेळणी किंवा वस्तू हातात पकडते, तोंडामध्ये टाकते, बालक रांगते, चालते, पळते. अशावेळी घरामध्ये व घराजवळील परिसरामध्ये अस्वच्छता असल्यास बालक वारंवार आजारी पडू शकते. म्हणून पालकांनी बालकाला जवळ घेताना, खाऊ घालताना, सु-शीचे कपडे बदलल्यानंतर नेहमी हात स्वच्छ धुवावे. घरामध्ये व आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी. बालकाचे कपडे व खेळणी नियमितपणे स्वच्छ करावीत. तसेच आजारापासून बचाव करण्यासाठी लसीकरण वेळापत्रकानुसार लसीकरण करावे. बालकाला आनंदी व हसरे ठेवण्याचा प्रयत्न करावा. बालके आजारी पडल्यास घरीच उपचार न करता लवकरात लवकर डॉक्टरच्या सल्ल्याने उपचार करावेत.

mother & baby

अतिशय महत्वाचे

निव्वळ स्तनपान

बाळाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान करावे. आईच्या दुधात असे तत्व असतात की, जे बाळाला रोग संक्रमणापासून लढण्यास मदत करतात.

बाटलीतुन दूध पाजू नये

बाटली पाण्याने धुतल्यानंतर बाटली आणि निप्पलच्या मध्यभागी थोडे दुध राहते त्यामुळे जीवजंतूंचा प्रादुर्भाव दूधात होतो. याच कारणास्तव बालकाला बाटलीने दुध पाजल्यावर त्याला हगवण, ताप इत्यादी आजार होतात.

लसीकरण

अनेक आजारांपासून बालकाचा बचाव करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जर लसीकरण पूर्ण घेतल्या गेले नाही तर भविष्यात बालकाला दुर्धर आजारांचा सामना करावा लागू शकतो. लसीकरण तक्त्यातील सर्व लसी शासनामार्फत मोफत पुरवल्या जातात.

जीवनसत्व अ

बालकाला डोळ्यांच्या आजारापासून बचाव करण्यासाठी ‘जीवनसत्व अ’अतिशय महत्वाचे आहे. तसेच इतर संक्रमणापासून देखील ते बालकाचे संरक्षण करते.

स्वच्छ ताजे आणि गरम जेवण

बालकांना नेहमी ताजे आणि गरम जेवण दयावे. शिजवलेले अन्न बालकाला स्वच्छ धुतलेल्या भांड्यातच द्यावे. शिळे अन्न खायला देणे टाळावे.

शुद्ध पिण्याचे पाणी

पिण्याचे पाणी स्वच्छ व शुद्ध असावे. पाणी शुद्ध असल्याची खात्री करूनच पाणी प्यावे किंवा बालकाला दयावे.

हात स्वच्छ धुणे

बालकाना संक्रमणापासून वाचविण्यासाठी सर्वात सोपा व परिणामकारक मार्ग म्हणजे स्वच्छ हात धुणे होय.

लक्षात ठेवा...

हात कधी धुवावे...

लसीकरण

  • गरोदर महिलेने गरोदरपणातील संपूर्ण लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. (धनुर्वात लसीचे दोन डोस)
  • बाळ जन्माला आल्यानंतर विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होऊन बाळ निरोगी राहण्यासाठी बाळाचे संपूर्ण लसीकरण वेळेवर पूर्ण करावे. अधिक माहितीसाठी खालील लसीकरण तक्ता वापरावा.

लसीकरणाची माहिती पत्रके

स्वच्छता व आरोग्यासंदर्भातील माहिती पत्रके