



कोण आहे तारा ?

तारा ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील ३ वर्षांची मुलगी आहे. ती एक बाल प्रतिभावान आहे, विलक्षण गायिका, वक्त्या असून तिचा आय.क्यू. १४०+ आहे.
ती नेहमी दोन वेण्या बांधते आणि तिच्या कपाळावर छोटीशी टिकली लावते. तिला योग्य आहार, उत्तेजन, काळजी आणि कुटुंबाचे प्रेम मिळाल्यामुळे तिला जीवनाची सर्वोत्तम सुरुवात मिळाली. तिच्या आनंदी, खेळकर स्वभावामुळे तिला अनेक मित्र आहेत आणि ती आसपासच्या गावांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. ती नवीन पालकांसाठी प्रेरणादायी आहे.
आमची तारा मार्ग दाखवते!
आभा ताईसोबत काम करत, तारा लहान मुलांच्या प्रारंभिक विकासाच्या महत्त्वाच्या तत्त्वांबद्दल जागरूकता पसरवत आहे.
आणि आभा ताई कोण आहेत?
आभा ताई या यवतमाळच्या स्थानिक अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका आहेत. त्या प्रेमळ आणि कष्टाळू असून, लहान मुलांच्या जीवनात होणाऱ्या बदलांविषयी खूप जागरूक आहेत. त्या आई-वडील आणि काळजीवाहकांना स्तनपान, पूरक आहार आणि खेळाचे महत्त्व यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करतात. ताराशी आणि तिच्या पालकांशी त्यांचे विशेष नाते आहे.

ताराच्या हुशारीमागे आभा ताईचं मोठं योगदान आहे. ताराचे पालक, जयंत आणि रेश्मा, आभा ताईच्या मार्गदर्शनानुसार, प्रारंभिक बाल विकासाचे (ECD) सर्व नियम पाळत आले आहेत. त्यामुळे आभा ताई आता त्यांच्या कुटुंबातील विश्वासू मित्र बनल्या आहेत, आणि त्यांची नियमित भेट घेतात. ताराच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आभा ताईला समाजातील काही अतिसंवेदनशील आणि कठीण विषयांवर काम करण्यास मदत झाली आहे.
ताराच्या कथा महाराष्ट्रातील हजारो अंगणवाडी सेविकांनी दिलेल्या अनुभवांवर आधारित आहेत.