डॉ. सुबोध गुप्ता

विभागप्रमुख, सामुदायिक आरोग्य विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम

डॉ. सुबोध एस गुप्ता बालरोगतज्ञ असून समाजाला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेले आरोग्याचे उपक्रमच उत्तम आरोग्यसेवा पुरवू शकतात असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतःला सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये झोकून दिले आहे. आरंभ उपक्रमाच्या कल्पनेपासून ते हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यापर्यंत त्यांचे मोलाचे योगदान आहे. सध्या महाराष्ट्र शासनाला आरंभ उपक्रमासाठी तांत्रिक साहाय्य देणाऱ्या गटाचे डॉ सुबोध गुप्ता नेतृत्व करत आहेत. यापूर्वी, युनिसेफच्या प्रकल्पाद्वारे त्यांनी अंदाजे १५,००,००० लोकसंख्येचा समावेश असलेल्या महाराष्ट्रातील १० तालुक्यांमध्ये आय सी डी एस आणि आरोग्य विभागाच्या मदतीने बालकांच्या संगोपनासाठी पालकांच्या सक्षमीकरणाचे मॉडेल विकसित करण्याचे काम केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, भारत नवजात बालकांच्या कृती योजना यासारख्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये योगदान दिले आहे. ते जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा येथील बालविकासाची मार्गदर्शक तत्वे तयार करणाऱ्या समितीचे सदस्य होते. ते राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या राष्ट्रीय सुकाणू समितीचे सदस्य देखील आहेत.

डॉ. चेतना मलिये

प्राध्यापक, सामुदायिक आरोग्य विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम

विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आवडीसोबतच डॉ चेतना मलिये यांचा समुदायावर आधारित संशोधनात हातखंडा आहे. माता, बाल व पौगंडावस्थेतील आरोग्य हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. त्यांना प्रतिष्ठेची FAIMER फेलोशिप मिळालेली आहे. त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या २०११ वर्षीच्या Control Strategies of Communicable and Non-communicable diseases at Royal Tropical Institute, Amsterdam, व IEA World Congress of Epidemiology 2011 Edinburgh, येथे सहभागी होण्यासाठी Centre for Population and Health Sciences, UK ची शिष्यवृत्ती या सारख्या जागतिक स्तरावरील शिष्यवृत्तींनी सन्मानित आहेत. त्यांनी माता व बाल आरोग्याशी संबंधित अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत. 2011-2013 या कालावधीत या जागतिक आरोग्य संघटना – इंटरविडाच्या बालविकास मॉडेल निर्मितीच्या अभ्यासात व बालविकास आणि ० – ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या संगोपनासाठी कुटुंब आणि समुदायाचे सक्षमीकरण या युनिसेफच्या अभ्यास प्रकल्पात त्या सह-अन्वेषक होत्या.

डॉ. अभिषेक राऊत

डॉ अभिषेक राऊत हे समाजासोबत नाळ जोडली गेलेले डॉक्टर, हाडाचे शिक्षक व उत्तम संशोधक आहेत. पब्लिक हेल्थचे क्षेत्र त्यांच्यासाठी अतिशय आवडीचे आहे. आरोग्य क्षेत्रातील असमानता दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे व समाजाला प्रशिक्षित करण्याचे काम करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ३० हुन जास्त शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. तसेच परिचारिका व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी बालकांचे आरोग्य व आहार संबंधित प्रशिक्षण पुस्तिकांसाठी त्यांनी लिखाण केलेले आहे. गावातील प्रमुख लोकांना व सामाजिक संस्थेतील कार्यकर्त्यांना गावात आरोग्यविषयक कार्यक्रम राबवण्यामध्ये सक्रिय करण्यात व प्रशिक्षित करण्यात डॉ अभिषेक यांचा हातखंडा आहे. मागील ८ वर्षांपासून ते अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवत आहेत. बालसंगोपन विषयावर ते मागील ७ वर्षांपासून एकात्मिक बाळ विकास प्रकल्प व आरोग्य विभागासोबत जवळून काम करत आहेत. सध्या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांतील १० तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बालसंगोपनाच्या अभ्यासगटाचे डॉ अभिषेक सध्या सह- अन्वेषक आहेत.

डॉ. प्रणाली कोठेकर

कार्यक्रम समन्वयक, आरंभ

डॉ प्रणाली गेल्या चार वर्षांपासून ‘बालविकास’ क्षेत्रात काम करत आहेत. त्यांना Implementation संशोधनात काम करण्याची आवड असून सध्या त्या ह्याच विषयाशी संबंधित PhD संपादन करत आहेत. समुदयाशी जोडलेले काम करण्याचे ध्येय ठेवून, वैदयकीय पदविनंतर त्यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतांना समाजातील वंचित घटकांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या. सामाजिक समस्येवर काम करतांना संशोधन करण्यावर त्यांचा भर आहे. समुदायीक वैद्यक विभागात MD करतांना त्यांनी विविध आरोग्याच्या समस्यांवरील संशोधन तसेच विकेन्द्रित सक्षम आरोग्य यंत्रणा यावर विशेष काम केलेले आहे. यूनिसेफ सहयायीत बालविकासाच्या ‘आरंभ’ उपक्रमात त्या मागील चार वर्षांपासून काम करत आहेत. ह्याच उपक्रमाचा विस्तार वाढवतांना आलेला अनुभव त्यांच्या साठी मोलाचा आहे आणि त्यांचा सार्वजनीक आरोग्य व महिला व बालकल्याण यंत्रणेवर ठाम विश्वास आहे. समुदायातील आरोग्य समस्यांचे विश्लेषण करतांना केवळ सेवा दृष्टिकोनच नव्हे तर संशोधन, नेटवर्किंग आणि advocacy हे सुदधा तेवढेच गरजेचे आहे, यावर त्यांचा विश्वास आहे.

पुनम कावडे

प्रशिक्षण व जिल्हा संपर्क अधिकारी

पूनम एक गोड स्मित आणि मधुर आवाज असलेली नाजूक आत्मा आहे. बालविकासासाठी काम करण्याचा प्रचंड अनुभव असलेल्या सामाजिक कार्यात त्या पदव्युत्तर आहे. त्या अतिशय प्रतिसाद आणि सहाय्यक करणारी प्रेरक व्यक्ती आहे. त्या स्वतः प्रशिक्षणामध्ये जे काही शिकतात ते अंगणवाडी सेविका, आशा आणि त्यांच्या पर्यवेक्षिकांना अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगतात. त्या केवळ भूमिकानाट्यात सहभागीच होत नाही तर खरोखरच एक बालकाची भूमिका स्वीकारण्यात सक्रिय असतात. त्यांच्या मध्ये समुदायातील प्रत्येक घटकाला बालसंगोपणासाठी आणि बालकांच्या पोषण काळजीसाठी सर्व क्षेत्रांना जुळून घेण्याचे कौशल्य आहे. आध्यात्मिक दृष्टीकोनातून दृढ आत्मविश्वासाने त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला आहे.

सम्राट खंडार

प्रशिक्षण व जिल्हा संपर्क अधिकारी

सम्राट यांनी सामाजिक कार्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले ते अतिशय सुव्यवस्थित, निरोगी व्यक्तीमत्व आहेत. त्यांच्याकडे उत्कृष्ट संवाद आणि सल्ला देण्याचे कौशल्य आहे. ते साधारण चार वर्षापासून बालविकासावर आधारीत काम करीत आहे. त्यांना समुदाय एकत्रीकरण करण्याचा व्यापक अनुभव आहे. ते एक हुशार सूत्रधार आहेत, त्यांच्याकडे प्रशिक्षण अधिक उत्कृष्ट बनविण्याचे कौशल्य आहे. ते एक उत्कृष्ट स्वयंपाकी आणि चांगले नर्तक आहे आणि त्यांना विविध प्रकारचे खाद्य पदार्थ खायला आवडतात.

सविता दखणे

प्रशिक्षण व जिल्हा संपर्क अधिकारी

सविता दखणे यांची शिक्षण पदवी (बी. एड.) अमरावती विद्यापीठातून आणि पदव्युत्तर पदवी ( एम.एस. डब्लू ) समाजकार्य विषयात संत तुकडोजी विद्यापीठ, नागपुर येथून पूर्ण झाले आहे. त्यांना समुदायासोबत काम करण्याची आवड आहे. तसेच बालविकासाविषयी सखोल माहिती आहे. त्यांचा निगा राखणाऱ्या व्यक्तीसोबत काम करण्याचा व समुदायातील लोकांना बालसंगोपनासाठी सक्षम बनविण्याबाबत व्यापक अनुभव आहे. समुदायामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांचे प्रशिक्षण देण्याचे कौशल्य उत्कृष्ट आहे. तसेच कार्यक्षेत्रामध्ये एक प्रतिसाद देणारी सूक्ष्म निरीक्षक आहे. त्या केवळ सामाजिक कार्यामध्येच संवेदनशील नाही तर त्यांच्या विचारावर ही त्यांचा दृढ आत्मविश्वास आहे. त्यांना प्रवास करीत असतांना विचारात रममाण व्हायला आवडते.

सोनाली कांबळे

प्रशिक्षण व जिल्हा संपर्क अधिकारी

सोनाली ह्या खूप मेहनती स्त्री असून, बालसंगोपणाची प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात कशी अमलबजावणी करायची याचे विशेष कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यांनी समाजकार्य विषयात पदवयुत्तर शिक्षण पूर्ण केले असून त्यांना समुदायाला सक्षम करण्याची आवड आहे. टीम मध्ये उल्लेखनीय काम करण्याचे कौशल्य असलेल्या सोनाली मध्ये प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे ऐकुन व समजून घेण्याची विशेष क्षमता आहे. प्रत्यक्षात पुढे न येता ही पाठीमागे राहूनही सर्व गोष्टी त्या व्यवस्थित सांभाळून घेतात. त्यानी वेगवेगळ्या मार्गदर्शक साहित्य विकसित करण्यात सक्रियपणे योगदान केले. यात त्यानी आपल्या मराठी भाषेवरील प्रभुत्व मिळविले. तुम्ही त्यांना चर्चेत महिलांचे हक्क आणि लिंग समानतेवर आपले मत मांडताना व वादविवाद करतांना पाहू शकता.

अतुल कातरकर

प्रशिक्षण व जिल्हा संपर्क अधिकारी

अतुल कातरकर हे एक आनंददायी स्मित आणि संवेदनशील हृदय असलेले एक व्यक्ती आहेत ज्यांनी सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्याकडे समुदायाला एकत्रीकरणाचा दांडगा अनुभव आहे. ते त्यांच्या सुंदर कौशल्याने उत्साहाने आणि खेळामध्ये कधीही न संपणार्‍या कृतीने, गाण्याने प्रशिक्षण अधिक उत्साही बनवितात. गटकार्य करण्यामध्ये ते एक उत्कृष्ट व्यक्ती आहे आणि काही सेकंदात गटामध्ये आपले स्थान निर्माण करतात. अतुल अतिशय कल्पक आणि कलाप्रिय अभिव्यक्ती आहे. त्यांच्याकडे खूप नवीन कल्पना असून त्यांचे हस्ताक्षर फार सुंदर आहे. ते मधुर गायन करत असून, त्यांना मित्रांसोबत नेहमी रोड ट्रिपचा आनंद घ्यायला आवडतो.

मंदा लोहट

प्रशिक्षण व जिल्हा संपर्क अधिकारी

समाजकार्य विषयात पदवी प्राप्त केलेल्या मंदाच्या चेहऱ्यावर सतत एक खोडकर आणि विलक्षण हसू असते. त्या एक प्रशिक्षक म्हणून अभिनय गीत, भूमीकानाट्य यांच्या मदतीने त्या उत्कृष्ट प्रशिक्षण देण्याची कामगिरी पूर्ण करतात. प्रशिक्षणा दरम्यान आवाजात चढ उतार आणणे तसेच आवाज अगदी सहज बदलण्याची अपवादात्मक क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्या स्वतः पालकांना त्यांच्या बालकांसोबत वयानुरूप बुद्धीला चालना देणाऱ्या शेकडो कृतीची माहीती असलेली एक लायब्ररीच आहेत. त्यांना महिला सक्षमीकरण मध्ये विशेष आवड असून त्या स्वतःसुद्धा महिला सक्षमीकरनाचे एक चांगले उदाहरण आहेत. इतक्या कृती त्यांना माहीत आहेत.आपल्या दिलखुलास हसण्याने आणि सततच्या मनमोकळ्या बोलण्याने त्या जिथे जातील तिथे आनंद पसरवीत असतात. त्यांना चांगला स्वयंपाक करायला आणि प्रेमाने तो सगळ्यांना खाऊ घालायला आवडते. जिथेही जाईल तिथे लोकांशी मैत्री करायलाही त्यांना आवडते.

मेघाराणी लाखे

प्रशिक्षण व जिल्हा संपर्क अधिकारी

मेघाराणी यांनी गृहविज्ञान पदवी (बी. एस्सी.) एस. एन. डी. टी. मुंबई विद्यापीठातून आणि पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी.) आहार आणि पोषणशास्त्र या विषयात संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथून घेतली आहे, तसेच त्या याच विद्यापीठामध्ये पी. एच. डी. करत असून “Nutritional Composition Of Less Familiar Vegetables In Marathwada Region” हा संशोधनाचा विषय आहे. अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. ‘आरंभ’ उपक्रमाच्या ‘पोषण’ या घटकाचे साहित्य बनवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. महाराष्ट्र राज्यात आढळणाऱ्या आहारातील रानभाज्यांचे त्यांना चांगले ज्ञान आहे. मराठी भाषेचे चांगले ज्ञान असल्यामुळे त्यांनी या कौशल्याचा वापर ‘आरंभ’ उपक्रमाचे प्रशिक्षण साहित्य, documentation, and SBCC materials बनवताना केला. त्यांना वाचन करणे, ऐतिहासीक स्थळांना भेटी देणे आणि कविता लिहिणे या गोष्टींमध्ये रस आहे.

गौरव पेठे

दस्तऐवजीकरण अधिकारी (Documentation Officer)

गौरव यांचे आयटी आणि मीडिया मध्ये शिक्षण सुरू आहे. आरंभ उपक्रमाचे कागदोपत्री (दस्तऐवजीकरण) काम ते फार उत्साहाने पार पाडत आहे. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व असून चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असते. त्यांच्याकडे वाचकाशी सहजपणे जोडले जाणारे अभूतपूर्व लेखन कौशल्य आहे. ते अपवादात्मकपणे मानवी आवडीचे लेखन, पॉडकास्ट ,कविता, लिहितात. त्याचप्रमाणे लेन्समागील (दुर्बीण)अनमोल क्षण टिपण्याची कला त्यांच्या मध्ये आहे. ते तांत्रिक अडचणी सोडविण्याकरिता गटामध्ये नेहमी उपलब्ध असतात. तालाची उत्तम ज्ञान असलेला ते एक सुंदर नर्तक आहे. ते लहान मुलांन सारखे नाचतात आणि आजोबा सारखा सल्ला देतात. त्यांच्या जीवनातील तीन आवडीच्या गोष्टी आहे; चहा, खिचडी आणि चित्रपट.

डॉ. राहुल पेठे

सनियंत्रण आणि मूल्यमापन अधिकारी

डॉ राहुल यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधून सार्वजनिक आरोग्य या विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यांना समाजात अधिक प्रमाणात समानता यावी या ध्येयाला घेवुन सार्वजनिक आरोग्यासाठी कामात उत्कृष्ट योगदान करायला आवडते. ते केवळ मेहनतीचं नाही तर त्यांच्या कामाप्रती समर्पित असूनही नवीन गोष्टी शिकण्यावरही त्यांचा विश्वास आहे. ते त्या काही मोजक्या लोकांपैकी एक आहेत. जे सतत विश्लेषनात्मक विचारांसोबतच चिकाटी वृत्तीचे असतात. बालसंगोपनाच्या या कामावर देखरेख ठेवणारी एक मजबूत कार्यप्रणाली तयार करण्यासाठी ते समुदायातील भागीदारा सोबत काम करीत आहे. सार्वजनिक आरोग्यामध्ये उत्कृष्ठ काम करण्याची इच्छा मनात बाळगण्या सोबतच सक्षमपणे मानवतेसाठी सुद्धा योगदान करायचे आहे. त्यांना थोडीशी स्वप्नाळू झोप घेतल्यानंतर पुदिना सरबत पीत मधुर संगीत ऐकायला आवडते.

डॉ. सुबोध गुप्ता

विभागप्रमुख, सामुदायिक आरोग्य विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम

डॉ. सुबोध एस गुप्ता बालरोगतज्ञ असून समाजाला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेले आरोग्याचे उपक्रमच उत्तम आरोग्यसेवा पुरवू शकतात असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतःला सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये झोकून दिले आहे. आरंभ उपक्रमाच्या कल्पनेपासून ते हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यापर्यंत त्यांचे मोलाचे योगदान आहे. सध्या महाराष्ट्र शासनाला आरंभ उपक्रमासाठी तांत्रिक साहाय्य देणाऱ्या गटाचे डॉ सुबोध गुप्ता नेतृत्व करत आहेत. यापूर्वी, युनिसेफच्या प्रकल्पाद्वारे त्यांनी अंदाजे १५,००,००० लोकसंख्येचा समावेश असलेल्या महाराष्ट्रातील १० तालुक्यांमध्ये आय सी डी एस आणि आरोग्य विभागाच्या मदतीने बालकांच्या संगोपनासाठी पालकांच्या सक्षमीकरणाचे मॉडेल विकसित करण्याचे काम केले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, भारत नवजात बालकांच्या कृती योजना यासारख्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील आरोग्यविषयक मार्गदर्शक तत्वांमध्ये योगदान दिले आहे. ते जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हा येथील बालविकासाची मार्गदर्शक तत्वे तयार करणाऱ्या समितीचे सदस्य होते. ते राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या राष्ट्रीय सुकाणू समितीचे सदस्य देखील आहेत.

डॉ. चेतना मलिये

प्राध्यापक, सामुदायिक आरोग्य विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम

विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या आवडीसोबतच डॉ चेतना मलिये यांचा समुदायावर आधारित संशोधनात हातखंडा आहे. माता, बाल व पौगंडावस्थेतील आरोग्य हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. त्यांना प्रतिष्ठेची FAIMER फेलोशिप मिळालेली आहे. त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या २०११ वर्षीच्या Control Strategies of Communicable and Non-communicable diseases at Royal Tropical Institute, Amsterdam, व IEA World Congress of Epidemiology 2011 Edinburgh, येथे सहभागी होण्यासाठी Centre for Population and Health Sciences, UK ची शिष्यवृत्ती या सारख्या जागतिक स्तरावरील शिष्यवृत्तींनी सन्मानित आहेत. त्यांनी माता व बाल आरोग्याशी संबंधित अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केले आहेत. 2011-2013 या कालावधीत या जागतिक आरोग्य संघटना – इंटरविडाच्या बालविकास मॉडेल निर्मितीच्या अभ्यासात व बालविकास आणि ० – ६ वर्षे वयोगटातील मुलांच्या संगोपनासाठी कुटुंब आणि समुदायाचे सक्षमीकरण या युनिसेफच्या अभ्यास प्रकल्पात त्या सह-अन्वेषक होत्या.

डॉ. अभिषेक राऊत

प्राध्यापक, सामुदायिक आरोग्य विभाग, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम

डॉ अभिषेक राऊत हे समाजासोबत नाळ जोडली गेलेले डॉक्टर, हाडाचे शिक्षक व उत्तम संशोधक आहेत. पब्लिक हेल्थचे क्षेत्र त्यांच्यासाठी अतिशय आवडीचे आहे. आरोग्य क्षेत्रातील असमानता दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारणे व समाजाला प्रशिक्षित करण्याचे काम करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ३० हुन जास्त शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. तसेच परिचारिका व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी बालकांचे आरोग्य व आहार संबंधित प्रशिक्षण पुस्तिकांसाठी त्यांनी लिखाण केलेले आहे. गावातील प्रमुख लोकांना व सामाजिक संस्थेतील कार्यकर्त्यांना गावात आरोग्यविषयक कार्यक्रम राबवण्यामध्ये सक्रिय करण्यात व प्रशिक्षित करण्यात डॉ अभिषेक यांचा हातखंडा आहे. मागील ८ वर्षांपासून ते अशा प्रकारचे विविध कार्यक्रम राबवत आहेत. बालसंगोपन विषयावर ते मागील ७ वर्षांपासून एकात्मिक बाळ विकास प्रकल्प व आरोग्य विभागासोबत जवळून काम करत आहेत. सध्या महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांतील १० तालुक्यांमध्ये चालणाऱ्या बालसंगोपनाच्या अभ्यासगटाचे डॉ अभिषेक सध्या सह- अन्वेषक आहेत.

डॉ. प्रणाली कोठेकर

कार्यक्रम समन्वयक, आरंभ

Dr. Pranali is a Ph.D. scholar and passionate to work in the field of early childhood development and loves to engage in implementation research. With a passion for community empowerment for health, after graduation, she joined as a Medical Officer in primary health centers in rural and tribal areas where she got to understand the health issues faced by the underprivileged section of society. With a strengthened belief in relevant research as a solution to societal challenges, she decided to pursue a career in public health. She has exposure to various community-based programs, mainly decentralized, affordable health care delivery for underprivileged rural communities. She has the experience of leading the field implementation team in a UNICEF-supported project for empowering families and communities for responsive caregiving in 10 community development blocks of Maharashtra with the experience of working with the system. She is a strong believer in the capacity of frontline functionaries and their supervisors and learned the opportunities and challenges while implementing a program at scale. She believes to analyze public health problems and initiate action not only through a service approach, but through research, networking, and advocacy.