प्रश्नोत्तरे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे
1. बालसंगोपनात वडिलांची भूमिका
अभ्यासातुन हे सांगण्यात येते की जे वडिल अगदी सुरुवातीपासून आपल्या बालकांसोबत नाते घट्ट बनवितात, ते त्यांच्या बालकांच्या विकासात सक्रिय भूमिका बजावतात. या गोष्टी त्यांच्या बालकांना आनंदी, निरोगी आणि हुशार होण्यासाठी मदत करतात . बालकांच्या जीवनातील सुरुवातीच्या १००० दिवसात, त्यांच्या मेंदूचा विकास इतर वेळेपेक्षा खूप जास्त होतो फक्त १५ मिनिटात मेंदूतील कितीतरी मज्जातंतु एकमेकांना जोडले जातात.
वडील आपल्या बालकांना प्रेमाने मिठीत घेऊन, त्यांचे पापे घेऊन, त्यांच्या सोबत साधे खेळ खेळून, गाणे गाऊन किंवा गोष्टी सांगून त्यांच्या विकासाला चालना देऊ शकतात. वडील आपल्या बालकांना जेवण भरवु शकतात, त्यांची आंघोळ घालणे तसेच शी सू चे कपडे बदलवून देण्यात सुद्धा मदत करू शकतात. वडील जेव्हा बालकांसोबत वेळ घालवितात तेव्हा ते बालकाला शारीरिक तसेच भावनिक सुरक्षिततेची भावना देऊ शकतात.
2. मुक्तखेळ
मुक्त खेळ म्हणजे जेव्हा बालक स्वतंत्रपणे त्यांना ज्या पद्धतीने खेळायचे आहे त्या पद्धतीने खेळू शकतात. ते स्वतः त्यांचे आवडते खेळ, ते खेळायची जागा निवडू शकतात. मुक्त खेळ खेळताना बालके स्वतःला तेथील परिस्थितीनुसार त्या वेळेनुसार व्यक्त करतात. बालकांना अश्या प्रकारे व्यक्त होण्याच्या संधी देणे महत्वाचे असते. प्रत्येक बालक हे विशेष असते तसेच त्यांचे स्वतःला व्यक्त करण्याचे मार्गही वेगळे असतात.
बालकांशी असे मुक्त खेळ खूप लवकर खेळायला सुरुवात करावी असे तज्ञ सुचवितात. पालकांनी आपल्या लहान मुलांना तसेच शालापूर्व वयातील बालकांनाही दररोज आपल्या देखरेखित असे मुक्त खेळ खेळण्यास प्रोत्साहित करायला पाहीजे. अगदी ६ महिन्याच्या बालकालाही मुक्त खेळांची ओळख करून देऊ शकतात.
कधीकधी बालकांनी एकट्याने खेळणे चांगले असते कारण या वेळी ते जास्त क्रियाशील राहून नवीन निर्मिती करतात. बालके जेव्हा एकटी खेळत असतात तेव्हा ती आपल्या कल्पकतेने स्वतःला गुंतवून ठेवतात. अगदी लहान वयापासूनच ते आत्मनिर्भर बनतात. कमी वयात आत्मनिर्भरता निर्माण होणे बालकांना भविष्यात फायदेशीर ठरते. मुक्त खेळ प्रश्न सोडविण्याची कला शिकण्यात महत्वाची भूमिका बजावतात.
3. कुटुंबाचं प्रेम
कुटुंबातील जवळीकता, कुटुंबाचे प्रेम हे बालकांच्या वाढ आणि विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या बालकांसोबत गाणे म्हणणे आणि घराच्या आजूबाजूला मिळणाऱ्या वस्तूंचा वापर करून संगीत तयार करणारी काही साधने तयार करणे, जसे छोट्या बटन किंवा दगड एखाद्या रिकाम्या बॉटल मध्ये टाकून ते खुळखुळ्या सारखे हलविणे. संगीत बालकांची ऐकण्याची क्षमता विकसित होण्यास मदत करते. तसेच हलणाऱ्या किंवा थरथरनाऱ्या वस्तुना पकडून ठेवताना त्यांच्या हातांच्या स्नायूंना बळकटी मिळते. सगळ्यात महत्वाचे आहे की अश्या खेळातून नवीन निर्मिती होते, तसेच बालकांना यातून आनंदही मिळतो.
तुमचे बालक स्वतः खेळत आहे, म्हणजे असे नाही की तुम्ही त्याच्या सोबत वेळ घालवु शकणार नाही. तुम्ही काम करीत असतांना जर तुमच्या बालकाला तुमच्या सोबत खेळावे वाटत असेल तर त्यांच्या सोबत ते करीत असलेल्या कामाबद्दल बोलायला सुरुवात करा. त्यांचे ते काम पूर्ण करून झाल्यास दोघे मिळून त्या कामाची पाहणी करा.
तुम्ही त्यांना घरातील वेगवेगळे साहित्य देवू शकता जे त्यांच्यासाठी सुरक्षित असेल उदा. घरातील भाज्या व फळे बालकांना देवून तुम्ही त्यांना ते सर्व रंग व आकार यानुसार वेगळे करायला सांगू शकता.
तुमच्या बालकाला तुमच्या सोबत स्वयंपाकघरात जेवण बनविण्यात मदत करायला घेवून जा. तुमच्या बाळाला तुमची मदत करायला आवडेल की नाही किंवा तुम्ही काय बनवित आहात यावरून तुम्ही ते ठरवा. ते तुम्हाला जशी मदत करेल तशी करू दया किंवा तुम्ही जसे काम करीत आहात त्याची नक्कल करायला सांगा.
4. संवेदनशील पालकत्वाचा आनंद
देणे आणि परत मिळविणे ही पालक व बालक यांच्यातील परस्परसंवादाची मालिका आहे. ही क्रिया त्यांच्यामध्ये आधी झालेल्या व पुढे होणाऱ्या परस्पर संवादावर आधारीत असते. जेव्हा पौढ व्यक्ति बालकांच्या आवाज आणि हावभावांना प्रेमाने व योग्य प्रतिसाद देतात तेव्हा ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बालकाला दाखवून देता की तुम्हाला त्याची काळजी आहे, आणि तुम्ही त्याच्या गरजा, भावना आणि त्यांना उत्साहित करणाऱ्या गोष्टीवर प्रतिक्रिया देणे हे दाखवून देते की तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत आहात.
अगदी जन्मापासून पालकांनी बालकांशी विचारांची देवाण घेवाण सुरू करावी. तुमच्या बालकाच्या बुद्धीच्या विकासाला किचकट बनविण्याची गरज नाही, ही क्रिया तुमच्या दैनंदिन कामातून आणि हालचालीतून घडणार असते. तुमचा तुमच्या बालकांसोबतचा प्रत्येक क्षण तुमच्या बालकांसाठी शिकण्याची आनंददायी संधी बनू शकते.
5. आनंदी घर
पालक बालकांना मजेशीर, खेळकर गोष्टीतून शिकण्याचा अनुभव घेण्यासाठी मदत व प्रोत्साहन देऊ शकतात. खेळतांना बालकाला इजा होणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी त्याच्या खेळण्याची जागा मोकळी अडथळे विरहित करा. ते खेळत असताना पूर्ण वेळ ते सुरक्षित राहील याकडे लक्ष दया. तुमच्या बालकांचे म्हणणे ऐकुण घ्या की त्याला आज काय करायचे आहे. त्यांनी संगीतल्याप्रमाणे त्यांना पाहिजे असे वातावरण तयार करा, ज्यातून त्यांना ते करीत असलेल्या कामात विशेष आवड निर्माण होईल. उदा. जर त्यांना घर बांधायचे असेल तर तुम्ही त्यांना घर बांधण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य देण्यासाठी तसेच योग्य जागा निवडण्यासाठी मदत करा. तुमच्या बालकाला कोणते साहित्य पाहिजे असू शकते व घरात आजूबाजूला काय उपलब्ध असेल यांचा विचार करा. जर तुमच्या बालकाला कोडे सोडवायचे असेल व घरात जर ते उपलब्ध नसेल तर घरातील काही चित्र तसेच कॅलेंडर यांचे तुकडे करून त्यातून कोडे तयार करून दया.
जेव्हा तुमच्या बालकाला कोणती समस्या येते तेव्हा ती समस्या सोडविण्यासाठी तुमच्या बालकाला ती सोडविण्यासाठी मार्ग दाखवा. बालकाला तुला काय करावे असे वाटते? तू ही समस्या कशी सोडविणार आहेस? असे प्रश्न विचारा. तुम्ही बालकांसाठी सर्व करून देऊ नका, तुम्ही त्यांना फक्त थोडे संकेत दया किंवा थोडी मदत करा जेणेकरून बालक विचार करून स्वतःची समस्या सोडवू शकेल.
बालकांचे कौशल्य विकसित करण्याकरिता काही कृती – त्यांना मऊ, खडबडीत असे वेगवेगळे स्पर्श अनुभवायला दया. वस्तु लपवा व त्यांना शोधायला सांगा. बालकांना वेगवेगळी किडी सोडविण्यासाठी प्रोत्साहित करा.
6. विशेष गरज असणारी बालके
बालकांमध्ये कुठलीही अक्षमता असली तरीही बालके खेळाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त शिकत असतात. प्रत्येक गमतीदार खेळ व कृती त्या बालकांच्या कौशल्य व क्षमता यांवर अवलंबून असते. त्यामुळे पालकांनी संयम ठेवून आपले बालक काय बोलते ही लक्षपूर्वक ऐकून घेत बालकांसोबतचा वेळ हा आनंदात घालवावा.
कापडाचा चेंडू हात व पायांचा वापर करून कसा खेळता येईल हे तुमच्या बालकाच्या गतीशीलतेनुसार ठरवा.
तुमच्या बालकाच्या गतीशीलतेनुसार त्याला जमेल अश्या पद्धतीने बालकासोबत बसा किंवा उभे राहा व एकत्र पुस्तक वाचा.
कणीक किंवा घरी बनविलेल्या क्ले सोबत खेळा. वेगवेगळे साचे घेऊन त्यानुसार आकार तयार करायचं प्रयत्न करा. यासाठी मोठ्या हॅंडल असलेले मोठे कप आपण वापरू शकता जेणेकरून आपल्या बालकाला ते पकडण्यासाठी सोयीस्कर होईल.
तुमच्या बालकासोबत गाणे म्हणा, नाचा व मोठमोठ्याने आवाज करा. तुमचे बालक यासाठी स्वयंपाक घरातील भांडी व घरगुती बनविलेले वाद्य सुद्धा वापरू शकतात.
पालक मेळावा हा मराठी शब्द आहे ज्याचा अर्थ पालकांची जत्रा असे होतो.हा गावस्तरावर मोठ्या पटांगणात पालक मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्याचा मुख्य उद्देश पालकांना बालसंगोपणाच्या विविध घटकांबाबत सक्षम करणे हा आहे. यात प्रामुख्याने सुरुवातीच्या काळातील बालविकास, आहार आणि आरोग्य यासंबंधी माहिती देणारी प्रदर्शन असते. पालक मेळावा ही संकल्पना पालकांमध्ये संवेदनशील पालकत्व रुजविणे, तसेच समाजातील महत्वाच्या सहभागीदारांचा सहभाग मिळवून बालविकासाची योजना तयार करणे होय.
गरोदर महिला आणि ० ते ६ वर्षाची बालके असलेली कुटुंब हे पालक मेळाव्याचे प्राथमिक लाभार्थी आहेत. समाजातील इतर सदस्य ज्यात,
१. किशोर वयीन मुले, मुली
२. नविन लग्न झालेली जोडपी
3. समाजातील मुख्य भागधारक
४. इतर विभाग ज्यात महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, पंचायत विभाग, बचत गट, शिक्षण विभाग यांचाही पालक मेळावा आयोजित करण्यात सहभाग असावा.
कुटुंबातील बाल संगोपणाचे वातावरण, मुलांना वाढविण्याची पद्धत आणि त्यांना अगदी लहान पानापासून शिकविल्या जाणाऱ्या गोष्टी यांचा बालकांच्या विकासावर परिणाम होतो, यात कुठेही जात,आर्थिक वर्ग आणि लिंग यांचा विचार नसतो. वंचित कुटुंबात जन्मलेल्या बालकांमध्ये लवकर हस्तक्षेप केल्याने परिस्थिति बदलून बालकांना त्यांच्या कमाल क्षमतेपर्यत पोहचण्यास मदत होते. बालपणीच्या विकासामध्ये गुंतवणूक करणे हे सामाजीक समृद्धीला चालना देण्यासाठी,समाजातील सर्वसामावेशकते मध्ये योगदान देण्यासाठी,आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी,अत्यंत गरिबीच्या परिस्थितीचा अंत करण्यासाठी तसेच पिढ्यानपिढया चालत आलेल्या असमानतेच्या चक्राला थांबविण्याचा एक मार्ग आहे.
उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शास्त्रज्ञांच्या मतानुसार एखादया देशाने बालविकासात केलेली गुंतवणूक ही त्या देशाची सगळ्यात मोठी गुंतवणूक ठरू शकते जी तिच्या आकारमानापेक्षा कितीतरी जास्त पटीने परतावा देते.
बालकांसाठी कुटुंबातील वातावरण हे अनुभव मिळण्याचे प्राथमिक स्त्रोत आहेत, बालकांचा इतर लोकांशी संपर्क येण्यात कुटुंबाचा सगळ्यात मोठा वाटा असतो. कुटुंब बालकांना घराबाहेरील वातावरणाची ओळख करून देतात, लहान मुलांनी मोकळ्या व प्रतिसादात्मक वातावरणात वेळ घालविण्याची गरज असते. बालकांना त्यांचे जग विस्तारण्यासाठी, खेळण्यासाठी, इतरांशी कसे बोलावे व त्यांचे बोलणे कसे ऐकुण घ्यायचे हे शिकण्यासाठी संधी पाहिजे अश्या संधी बालकांना उपलब्ध करून देण्यासाठी कुटुंबातील सदस्याना सक्षम करणे गरजेचे आहे.
मेंदूच्या जाळ्याचा खेळ ही सहभागातून घेतली जाणारी कृती आहे. या कृतीतुन समुदायाला बालकांच्या सुरुवातीच्या वर्षातील अनुभवांचा त्यांच्या मेंदूतील मज्जातंतूचे जाळे तयार होण्यामधील भूमिका तसेच मेंदूच्या विकासाबाबत संवेदनशील बनविण्यात मदत करते. मेंदूच्या विकासावर परिणाम करणारे घटक, त्याला चालना काशी मिळते, तसेच अडथळे कसे येवू शकतात हे स्पष्ट करते. मेंदूच्या विकासातील प्रेमळ नातेसंबंधांची सशक्त भूमिका व त्याकरिता अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी,तसेच बालपणातील वाईट अनुभवांचा बालकांच्या मेंदूच्या विकासावर होणाऱ्या विपरीत परिणामाबाबत समुदायाला जोर देवून सांगण्यासाठी मदत करते.
मुले जन्मापासुनच जिज्ञासू असतात त्यांना त्यांच्या आजूबाजूचे जग समजून घ्यायचे असते. प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी नवीन असते. घराबाहेर एक मोठ जग आहे जे समजून घेण्याच्या मार्गात पालकांनी अडथळा आणू नये. पण हे करीत असतांना बालक पूर्णपणे सुरक्षित राहील याची खात्री पालकांनी करून घ्यावी.
बालकांना खूप जास्त रचनात्मक पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करू नका. पण त्याच्यासाठी शिकण्याच्या ज्या अगणित संधि आहेत उदा. बालकांसाठी गाणे म्हणणे, त्याच्या साठी वाचन करणे, बालकाला बाहेर फिरायला घेऊन जाताना कडेला तिथे बघ एक झाड आहे, एक कुत्रा आहे, एक कार आहे एक घर आहे अश्या गोष्टी दाखवून त्या बद्दल बोला.
मेंदूचा विकास गरोदरपणा पासून ते वयाच्या २ वर्षापर्यंत अतिशय झपाट्याने होतो, या काळात प्रत्येक जेवणातील ७५% भाग हा तुमच्या बालकाच्या मेदूच्या विकासासाठी वापरला जातो. या काळात १५ मिनिटांचा बालकांचा खेळात मेंदूत हजारो मज्जातंतु एकमेकांशी जोडल्या जातात. म्हणून पालकांनी हे लक्षात ठेवायचे आहे की तुमचे बालकाला प्रेमाने जवळ घेणे, त्याचे पापे घेणे, त्यांना पोषण आहार देणे, त्यांच्या सोबत खेळ खेळणे सगळेच तुमच्या बालकाच्या बुद्धीच्या विकासाकरीता मदत करीत असते.
रात्रीच्या वेळी झोपायचे आणि दिवसा जागे राहायचे हा सर्वसामान्य नियम आहे हे बालकांना माहीत नसते. त्यामुळे ते सहसा ३ ते ४ तासांसाठी झोपतात. जेवायला उठतात आणि नंतर झोपतात. बालकांच्या मेंदूचा विकास होत असतांनाच त्यांना झोप न येण्याची अनेक कारणे असतात त्यांना अनेक गोष्टीबद्दल उत्सुकता असते, ते आपल्याच जगामध्ये गुंतलेले असतात. पालक आपल्याशी बोलत आहेत, ते आपल्या साथी वाचत ह्या क्रिया त्यांना थोडा वेळ जागे ठेवू शकतात असे वाटते. आपल्या निगा राखणाऱ्या व्यक्ति सोबत गुतून राहणे त्यांच्या सोबत संवाद साधने आजूबाजूच्या जगाला समजून घेणे आणि नंतर झोपी जाणे हा त्यांचा दिनक्रम असतो.
अनेक चांगल्या शोधामध्ये नवजात बालकांसाठीच नाही तर सर्वच जीवांसाठी स्पर्श किती महत्वाचा आहे याचे पुरावे मीळतात. आपण कांगारू माता पद्धती बद्दल बोलत आहोत,अगदी सुरुवातीपासून नवजात बाळाला आईच्या अंगावर बोलतो आहे, असा स्पर्श बालकांसाठी आरामदायी असतो तर आईलाही शांत ठेवण्यासाठी मदत होते.अश्या अनेक कारणांसाठी स्पर्श हा विलक्षण महत्वाचा आहे.
भाषा शिकवीत असतांना काही गोष्टीत सुसंगतता असणे महत्वाचे आहे, जेणेकरून लहान बालक गोंधळून जाऊ नये. कधी कधी एक पालक एक भाषा असावी, कधी कधी एक कृती व एक भाषा असावी. पण सरते शेवटी बालक स्वतःच मार्ग काढून दोन्ही भाषा योग्य प्रकारे वापरायला सुरुवात करेल. जसे पालक बाळकांसोबत बोलत असतात,बालकांसाठी गाणे म्हणतात, बालकांसोबत वाचन करतात, बालकांच्या मेंदूला चालना देणारे अनुभव देतात यातून शिकण्याचा विस्तार होतो. हे सर्व जाळे मेंदूत विकसित होत असते. जीवनभर शिकण्याचा पाया हा सुरुवातीच्या महत्वपूर्ण वर्षांमध्ये घातला जातो. जर पालकांनी हे सर्व प्रदान केले तर बालकांच्या मेंदूचा विकास होईल आणि पालकांना पाहिजे असलेल्या बालकांच्या सर्व क्षमता विकसित होईल.