You are currently viewing Articles 2

Articles 2

  • केवळ स्तनपान– जोपर्यंत बालकासाठी आईचे दूध उपलब्ध असेल तोपर्यंत तेच सर्वात उत्तम आहे. आईच्या दुधात असे तत्व असतात की, जे बाळाला रोग संक्रमणापासून लढण्यास मदत करते.
  • बाटलीतुन दूध पाजू नये – ज्या बालकांना बाटलीने दुध पाजले जाते त्यांना हगवण, ताप इत्यादी आजार होणे ही सामान्य बाब आहे. कारण पाण्यानी धुतल्यानंतर बाटली आणि निप्पलच्या मध्यभागी थोडे दुध राहते त्यामुळे जीवजंतूंचा प्रादुर्भाव दूधात होतो.
  • लसीकरण – बालकांना जे आजार सामान्यपणे होऊ शकतात अशा आजारासाठी लसीकरण करावे.
  • जीवनसत्व अ – बालकांना डोळ्यांच्या आजारापासून बचाव करण्यासाठी ‘जीवनसत्व अ’अतिशय महत्वाचे आहे. तसेच इतर संक्रमणापासूनदेखील ते संरक्षण करते.
  • स्वच्छ ताजे आणि गरम जेवण – बालकांना नेहमी ताजे आणि गरम जेवण दयावे. शिजवलेले अन्न बालकाला स्वच्छ पाण्याने धुतलेल्या भांड्यातच द्यावे. शिळे अन्न खायला देणे टाळावे.
  • शुद्ध पिण्याचे पाणी – पिण्याचे पाणी स्वच्छ व शुद्ध असावे. आपल्याकडील आजुबाजूच्या परिसरातील पाण्याचे दुषित होण्याचे मुख्य कारण म्हणजे उघड्यावर शौच होय. पाणी शुद्ध असल्याची खात्री करूनच पाणी प्यावे किंवा बालकाला दयावे.
  • हात स्वच्छ धुणे – बालकांना संक्रमणापासून वाचविण्यासाठी सर्वात सोपा व परिणामकारक मार्ग म्हणजे स्वच्छ हात धुणे होय. शौचानंतर, जेवण बनविण्यापूर्वी, बालकांना भरविण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ हात धूणे गरजेचे आहे. 

Leave a Reply

13 − 8 =